ताज्या घडामोडी

शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनात होणार शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक – श्री दिपक साबळे

Spread the love

गुहागर (प्रतिनिधी)
१०८ वर्षांची समृध्द परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या व्यासपीठावरच आज पर्यंत शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक झाली आहे.यावेळी होणा-या राज्य अधिवेशनातही शिक्षकांच्या विविध महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष दिपक साबळे यांनी दिली
जुनी पेन्शन सारखा महत्वाचा विषय प्रामुख्याने घेऊन १८ मार्च २०२२ रोजी पनवेल येथे भव्य अधिवेशन पार पडणार आहे हे अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून सदर अधिवेशनाचे उदघाटक मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब असणार आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विविध विभागांचे मंत्री, राज्यमंत्री, आमदार खासदार यांची प्रमुख उपस्थिती सदर अधिवेशनास असणार आहे
आपल्या प्रलंबित मागण्यांना पाठबळ देण्यासाठी शिक्षक बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने सदर राज्य अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष दिपक साबळे व कार्यकारिणीच्या यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!