आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीची ९ मार्चला  बंदची हाक.

पुणे - मुंबई महामार्गावरील, सोमाटणे येथील अनधिकृत टोलनाका कायमचा बंद व्हावा, यासाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली आहे.

Spread the love

सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीची ९ मार्चला  बंदची हाक.Somatne Toll Naka Hatav Akti Samiti call for bandh on March 9.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ मार्च.

तळेगाव दाभाडे येथील, पुणे – मुंबई महामार्गावरील सोमाटणे येथील अनधिकृत टोलनाका कायमचा बंद व्हावा, यासाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली आहे.आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जोशीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात रविवारी (दि.५)बैठक पार पडली. यावेळीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवार (दि.९) रोजी तळेगाव दाभाडे शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे.
शनिवार (दि ११) रोजी सोमाटणे टोलनाका येथे बेमुदत निवासी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक.किशोर आवारे यांनी दिला.आवारे म्हणाले,हे आंदोलन कायद्याचे पालन करून अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे.

सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर आहे, या संदर्भातील सहा कागदपत्रांचे पुरावे दिले आहेत. आमच्या आरोपात तथ्य आहे.सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे यासंदर्भातील एक तरी पुरावा टोलनाका प्रशासनाने सादर करावा.
तसेच टोलनाक्यावर प्रेम असणाऱ्या मंडळींनी व टोलनाक्याकडून पाकीट सुरू असणाऱ्या मंडळींनी सदर आंदोलनाला येऊ नये असा निर्वाणीचा इशारा आवारे यांनी दिला आहे.

तळेगाव शहरातील सर्व व्यापारी, भाजी विक्रेते, रिक्षा चालक संघटना, टेम्पो चालक संघटना या सर्वांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.यावेळी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी उपनगराध्यक्ष.‌सुशील सैंदाणे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, आशिष खांडगे,माजी नगरसेवक, निखिल भगत, संतोष शिंदे, सुनील कारंडे, सुनील (मुन्ना ) मोरे,
कल्पेश भगत, संतोष शेळके, अंकुश ढोरे, मुन्ना जाधव,
प्रमोद देशक, सुनील पवार, अनिल पवार,
गणेश बाबर, सतिश ढेंबे, दिलीप डोळस, महेंद्र ओसवाल उपस्थित होते.

कल्पेश भगत यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जांभुळकर, सुशील सैंदाणे, गणेश काकडे ,दिलीप डोळस, सतिश ढेंबे, गणेश बाबर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!