आरोग्य व शिक्षण

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती पदाधिकाऱ्यांचा महापौरांनी राजीनामा घ्यावा – विशाल वाकडकर

Spread the love

चिंचवड : महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी स्थायी समिती पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मागील महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या लाच प्रकरणामुळे महापालिकेच्या नावलौकिकास धक्का बसला आहे. भाजपची सत्ता आल्यापासून मनपाचे नाव चांगल्या क्षेत्रात येण्याऐवजी भ्रष्टाचारात गाजत आहे यामुळे भ्रष्टाचारी पदाधिकार्‍यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापौरांना देण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सदस्या सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनावणे, राजू बनसोडे,प्रविण भालेकर, विशाल वाकडकर, संतोष वाघेरे, प्रसाद कोलते, चेतन फेंगसे, अक्षय माछेरे, प्रतीक साळुंखे आफ्रिद शिकलगार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!