आरोग्य व शिक्षण

ऑनलाईन व्यवहार जनसामान्यात रुजविण्याची गरज – डॉ. दीपक शहा

Spread the love

चिंचवड : चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्यूटर स्टडीजच्या वतीने ‘रीथिंकिंग लँग्वेज ऑफ मनी‘ या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. शहा यांनी सहभागींना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.

यावेळी ते पुढे म्हणाले, “युवा पिढीने शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान“ आत्मसात करीत ऑनलाईन व्यवहार शिकण्याची आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज इंटरनेट बँकींग, ई-कॉमर्स आदींसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. काही सायबर हॅकर्स याचा गैरफायदा ही घेताना आढळून आले आहे. विविध प्रभोलनापासून प्रत्येकाने सावध राहत, आपल्या बँक खात्यातील पैसे ट्रान्सफर करताना सुरक्षित कसे राहतील. यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या वेबिनारमुळे समाजात जनजागृती होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

‘रीथिंकिंग लँग्वेज ऑफ मनी‘ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार चलनाचे बदलते प्रकार, वस्तूंची अदलाबदल करून झालेला व्यापार, मोबाईल मनी आणि क्रिप्टोकरन्सी आदींबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रमुख डॉ. पराग काळकर, धारवाड विद्यापीठाचे डॉ. एस.टी. बागलकोटी, राजकोट येथील सनसाईन इन्स्टिट्यूटचे डॉ. दीप्ती शर्मा, चंदीगड येथील डॉ. शालिनी अगरवाल, पुणे येथील डॉ. किर्ती धारवाडकर यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.

या  वेबिनारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब समवेत इतर राज्यातील 530 हून अधिक वाणिज्य विभागातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तुविनियम पद्धतीद्वारे होत असे श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबादल्यात विविध पदार्थांची देवाण-घेवाण होत असे या व्यापारात चलनाचा वापर होत न्हवता. लोक मुख्यतः सुवर्ण आणि इतर धातूच्या नाण्याचा उपयोग करीत होते. विसाव्या दशकात उद्योग, व्यापार, उत्पादन, वाहतूक क्षेत्रात जगभरात क्रांती झाली. बँक, धनादेश, आदेशपत्रे, मनीऑर्डर आदीत चलनाचा वापर होत असतानाच आजच्या 21 व्या शतकात अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणक, मोबाईल क्रांतीमुळे व्यापार आदी क्षेत्रात ऑनलाईन पेमेंट केले जाते. विविध पेमेंट अ‍ॅपचा ही वापर केला जातो. याबाबत तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

संपूर्ण सत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या डॉ. श्रृती गणपुले, सहाय्यक प्रा. दिनेश लाहोरी डॉ. अनामिका घोष, प्रा. दिव्या नायर आदींनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नचनानी यांनी तर, आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!