ताज्या घडामोडी

२ एप्रिल रोजी सांगली येथील पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वतीने वाळवा तालुक्यात संपर्क मोहिम

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतरावजी पाटीलसाहेब व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास वाळवा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव व कार्यकर्ते जाणार असुन यानिमित्ताने वाळवा तालुक्यात संपर्क मोहिम गतिमान करण्यात आली आहे.

साखराळे ता. वाळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाळवा तालुका अध्यक्ष, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मा. श्री. विजयराव पाटील (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली खाली व्यापक बैठक संपन्न झाली.

यावेळी मल्हार सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख श्री. सुनिल मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत प्रास्ताविक वाळवा पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. शिवाजीराव डांगे यांनी केले.बैठकीस श्री. किसनराव गावडे (वाळवा), प्रकाश कनप (हूबालवाडी), डी. वाय. तांदळे (शिरटे), श्री. बजरंग कदम यांच्या सह साखराळेतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!