ताज्या घडामोडी

शाळा पूर्व तयारी तयारी अभियान प्रशिक्षण केंद्र जांभारी उत्साहात.

Spread the love

केंद्र जांभारी शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण शाळा चाफेरी नंबर १ येथे उत्साहात पार पडले. तालुकास्तरावर प्रशिक्षित श्री सुशील वासावे व सौ प्रज्ञा वाघोदे यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शाळा पूर्वतयारी अभियानाबाबत अतिशय उत्तम रित्या मार्गदर्शन करून प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण दिले. केंद्रप्रमुख मांजरेकर मॅडम यांनी चांगल्या प्रकारे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंगणवाडीताईंच्या संपामुळे फक्त जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बैकर तसेच उपाध्यक्ष श्री सावंत त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ला दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिकासाठी आवर्जून उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये दवंडी देणे, जनजागरण फेरी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक, भावनिक ,मानसिक, गणन पूर्व तयारी, भाषा या विषयासंदर्भात विद्यार्थ्याला असलेल्या पूर्वज्ञान पडताळून पाहण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शनही करण्यात आले. अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सदरचे प्रशिक्षण पार पडले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!