आरोग्य व शिक्षण

मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्षपदी तुकाराम गायकवाड

Spread the love

वडगाव मावळ : मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष पदी तुकाराम सखाराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड तीन वर्षांसाठी असल्याचे सल्लागार समितीने जाहीर केले. यावेळी आळंदी येथे मावळ तालुका दिंडी समाज धर्मशाळा येथे सर्व प्रमुख वारकरी पदाधिकारी सल्लागार समिती यांची बैठक झाली. या बैठकीत एकमताने मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्षपदी ह भ प तुकाराम सखाराम गायकवाड यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी माजी अध्यक्ष नरहरी केदारी, माऊली शिंदे, राजाराम शिंदे,काळूराम मालपोटे,तुकाराम असवले, शांताराम काजळे, बंडोबा सातकर, बबन कोंढरे,लक्ष्मण बालगुडे, धोंडीबा केदारी, रोहिदास धनवे, तुकाराम नाणेकर, गणेश काजळे, नारायण ठाकर, राजेंद्र सातकर आदींसह पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!