आपला जिल्हासामाजिक

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर फाकटकरांचे उपोषण मागे.

Spread the love

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर फाकटकरांचे उपोषण मागे.After the assurance of the chief executive, the hunger strike of the workers is called off.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ एप्रिल.

तळेगाव दाभाडे परिसरामध्ये सुसज्ज असे शौचालय महिला वर्गासाठी तसेच पुरुष वर्गासाठी स्वतंत्रपणे व्हावे या मागणीसाठी तळेगाव शहरातील आदर्श शिक्षक सामाजिक कार्यकर्ते नितीन फाकटकर यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मारुती मंदिर चौक येथे पुकारले होते.
तळेगाव शहरातील विविध सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी सकाळपासून उपोषण स्थळी भेट दिली.

मारुती मंदिर चौक ते जिजामाता चौक या भागात सुलभ शौचालय उभारणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तळेगाव विभागात शौचालय वाढवणे,महिला वर्गासाठी एक विशेष शौचालय उभारणी
तळेगावच्या सर्व शौचालयांची स्वच्छता नियमितपणे करणे या प्रमुख मागण्यांसाठी नितीन फाकटकर यांनी उपोषण पुकारले होते.

 

नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. तसेच येत्या काही काळात नगर प्रशासन योग्य ती जागा निवडून शौचालयांचा प्रश्न मार्गी लागेल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नितीन फाकटकर यांनी नगरसेवक संतोष भेगडे व प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित केले.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी फोन द्वारे नितीन फाकटकर यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली तर स्वखर्चातून शौचालय बांधू असे जाहीर केल्यामुळे आंदोलन कर्त्यांमध्ये मध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली.उपोषणाच्या दरम्यान विविध संस्थांच्या मान्यवरांनी तसेच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी नितीन फाकटकर यांना भेट दिली.

संतोष हरिभाऊ भेगडे पाटील, नगरसेवक संतोष भेगडे, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक फल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष शैलजा काळोखे, विनाताई करंडे, नगरसेवक समीर खांडगे, शिवसेना शहराध्यक्ष दत्ताभाऊ भेगडे, सुनील उर्फ मुन्ना मोरे, अमित भेगडे, मंगेश गारोळे उद्धव चितळे, महेश महाजन, राजेंद्र पोळ, सचिन टकले आदी मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!