आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराजवळ, खाजगी बस दरीत कोसळून भीषण आपघात, बारा प्रवासी ठार;२८ गंभीर जखमी.

Spread the love

खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळून भीषण आपघात ; बारा प्रवासी ठार;२८ गंभीर जखमी.Horrific accident in Khandala Ghat near Shingroba Temple when a private bus fell into the valley; Twelve passengers killed; 28 seriously injured.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १५ एप्रिल.

खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराचे मागे खाजगी बस दरीत कोसळून भीषण आपघात झाला.आज पहाटे चार ते साडेचार दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात सुमारे बारा प्रवासी ठार झाले ;तर ;२८ गंभीर जखमींना खोपोली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

 

मिळालेल्या खाञीशीर माहितीनुसार आज पहाटे पुण्यावरून राञीच्या कार्यक्रमानंतर गोरेगावकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मधे चाळी ते पंचेचाळीस जण प्रवास करत होते.रायगडचे पोलिसअधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिल्यावरून घटनास्थळाकडे बोरघाटातील पोलिस , खोपोली शहरचे पोलिस , लोणावळ्याचे शिवदुर्ग मिञचे रेस्कु पथक , वन्यजीवरक्षक संघटना मदत कार्यासाठी पोहोचले आहेत.मृतदेह आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यची रेस्कु टीमने कामगिरी केल्यानंतर खोपोली व आयआरबी च्या रूग्णवाहिका मधून त्यांना खोपोली येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या बसमधील सर्व प्रवाशी गोरेगावमधील बाजीप्रभु वादक गट (झांजपथकामधील ), हे तरूण आहेत. पुण्यातील कार्यक्रम संपवून सर्वजण गोरेगावकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.बसचा आक्षरशा चुराडा झाला.
शिंग्रोबा मंदिरामागील तीव्र उतार व वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडल्याचे समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड चे जिल्हाधिकारी व पोलिसअधिक्षक यांचेशी संपर्क साधून आपघाताची माहिती घेतली व मदतकार्य करणा-या रेस्कू पथकांना , हायकर्स आणि आयआरबी टीमचे देवदूतांशी संवाद साधला व मदतकार्याबाबत सूचना दिल्या.
तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच जखमीवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!