आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

तळेगावात कलामहोत्सव २०२३ चा शानदार प्रारंभ .

यशवंत नगर तपोधाम परिसरातील कलाकारांचा कलामहोत्सव २०२३ चा दिमाखात प्रारंभ.

Spread the love

तळेगावात कलामहोत्सव २०२३ चा शानदार प्रारंभ .Talegaon Kalamahotsav 2023 started on a grand scale.

यशवंत नगर तपोधाम परिसरातील कलाकारांचा कलामहोत्सव २०२३ चा दिमाखात प्रारंभ.Art Festival 2023 of artists of Yashwant Nagar Tapodham area started in Dimakhat.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ एप्रिल.

आज सकाळी १० वा. मा. विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व फ्रेंड्स ऑफ नेचर चे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांच्या हस्ते यशवंत नगर तपोधाम परिसरातील कलाकारांचा कलामहोत्सव २०२३ चा फ्रेंड्स ऑफ नेचरच्या निसर्ग अभ्यासिकेत वृक्षपूजन करून दिमाखात प्रारंभ झाला. मा.नगरसेवक निखिल भगत, वसंत भापकर आणि परिसरातील नागरिक व कलाकार मोठ्या संखेने उपस्थित होते.

मागील महिन्यापासून यशवंत नगर तपोधाम परिसरात, आपला परिसर, सुंदर करण्याच्या प्रयत्नातून भिंतीवर सुंदर कलाकृती निर्माण करण्याची सुरुवात झाली होतीच, आज पासून सुरु झालेल्या कलामहोत्सवामूळे तळेगावातील कला प्रेमी नागरिकांना आपल्याच गावातील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या महोत्सवाची संकल्पना चित्रकार रविराज हरीप,अदिती बिचे आणि मा.नगरसेवक निखिल भगत यांची, ती संकल्पना साकारलीय जेष्ठ कलाकार रूपक साने व विश्वास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकार, डी.वाय.पाटील महाविद्यालयाच्या कला आणि स्थापत्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आणि मिनर्व्हा आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशवंत नगर,तपोधाम परिसरातील या कलाकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तळेगावातील इतर परिसरातील नागरिकांनी बोध घेतला तर आपले तळेगाव स्वच्छ व सुंदर नक्कीच होईल असे मनोगत मा. विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केले व उपक्रमाला सर्व प्रकारचे सहाय्य नगर परिषद देईल असे आपल्या मनोगतात सांगितले.

अश्या प्रकारचे प्रदर्शन तळेगावात प्रथमच होत असल्याचे मा.महेश महाजन यांनी सागितले व फ्रेंड्स ऑफ नेचरची अश्या उपक्रमाला नेहमीच साथ मिळेल याची ग्वाही दिली
कला महोत्सव प्रत्यक्षात येण्यासाठी निरंजन जहागीरदार,सचिन कहडणे,निलेश जाचक, मिलिंद देशपांडे ,भाग्यश्री साळवे(देशपांडे),ज्योती साने आणि प्रकल्प प्रमुख डॉ.गणेश सोरटे आणि निखिल भगत मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

या महोत्सवात संजय कोलणकर यांची टेराकोटा वस्तू तयार करण्याची तसेच चित्र कला विषयाच्या विविध अंगाच्या कार्यशाळा अनुभवायला मिळणार आहेत. मीरा बेडेकर यांच्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू तसेच शोभेच्या लाकडी वस्तु तयार करणारे श्रीकांत हुंडेकरी यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि ज्योती रूपक साने यांनी १५० तास मेहनत करून तयार केलेली गोधडी (कवंदी) पहायला मिळणार आहे.
कला महोत्सव २०२३ ला आपण सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत आपण जरूर भेट द्यावी ही विनंती कला महोत्सवाचे प्रायोजक मा.निखिल भागात यांनी केली आहे.
हा कला महोत्सव फ्रेंड्स ऑफ नेचर च्या यशवंत नगर तळेगाव स्टेशन येथे दि.१५ व १६ एप्रिल पर्यंत असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!