आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन, जर्मनी या ठिकाणी एक अभूतपूर्व सोहळा पार पडला.

त्यावेळी डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ. अमरसिंह निकम यांना सन्मानित करण्यात आले.

Spread the love

डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन, जर्मनी या ठिकाणी एक अभूतपूर्व सोहळा पार पडला.Dr. Samuel Hahnemann’s 268th birthday was marked by an unprecedented celebration in his native town of Meissen, Germany.

आवाज न्यूज : लोणावळा वार्ताहर, १५ एप्रिल.

त्यावेळी डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ. अमरसिंह निकम यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. अमरसिंह निकम चाळीस वर्ष होमिओपॅथी द्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथी मध्ये संशोधन करून होमिओपॅथी मधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने चालवत आहेत.

हजारो हृदय, किडनी, लिव्हर फेल्युअर यांसारख्या असाध्य रोगांना बरे करत जागतिक पातळीवर होमिओपॅथीला उत्तम आणि उच्च दर्जा देऊन तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवले. मिशन होमिओपॅथी संघटना स्थापन करून शंभर डॉक्टरांची टीम तयार केली जी जगभर मोठमोठ्या शहरात, खेड्यापाड्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीचा प्रसार करण्याचे योगदान निरंतर करत आहे. त्याचबरोबर कोविड सारख्या महामारीत दिवस-रात्र निर्भीडपणे कोविड महामारी थोपवण्याचे काम केले.

या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम,  डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. त्यावेळी. सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील असंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. हा सोहळा आय. एच. झेड. टी. या संस्थेने आयोजित केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!