आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

भांगरवाडी येथे नवमी भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ता.१८ रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता..

Spread the love

भांगरवाडी येथे नवमी भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ता.१८ रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता..Navmi Bhajani Mandal organized at Bhangarwadi in Akhand Harinam week on 18th with kirtan of Kali.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी १५ एप्रिल.

भांगरवाडी येथे नवमी भाजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ ता.११ रोजी झाला आसून ता.१८ रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे.रोज पहाटे ४ ते ६ काकडाआरती , सकाळी ८.३० ते १२.३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , दुपारी ११ .३० ते १२.३० गाथा भाजन ,सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ आसा कार्यक्रम होत आहे.

ता.११ रोजी सायंकाळी ६ ते ७ ह.भ.प. काळुराम महाराज देशमुख (देवघर ),यांचे प्रवचन व राञी ९ ते ११ ह.भ.प. पद्मानाथ महाराज व्यास ( तेरगाव , धाराशीव ),यांचे कीर्तन झाले.
ता.१२ रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज घुले (इंदोरी ) यांचे प्रवचन ;तर ह.भ.प राम महाराज झिंजुर्के (जोगमहाराज संस्थान , शेगाव), यांचे कीर्तन झाले.
ता.१३ रोजी हृ.भ.प.तुषारमहाराज दळवी (भाजे ) यांचे प्रवचन झाले ;तर राञी ह.भ.प.डाॕ.जलाल महाराज सय्यद (करंजीकर), यांचे कीर्तन झाले.
ता.१४ रोजी ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर (कान्हे ),यांचे प्रवचन झाले.राञी ह.भ.प.रामदास महाराज पाटील (वाऊशी ), यांचे कीर्तन झाले.
ता.१५ रोजी .ह.भ.प.कल्याणीताई नामाजोशी (पुणे ), यांचे प्रवचन झाले , राञी ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले (पुणे ),यांचे कीर्तन झाले.
ता.१६ रोजी ह.भ.प.महेश महाराज आठवले (पुणे ),यांचे प्रवचन , ;तर राञी ह.भा.प.आशोक महाराज जाधव (आकुर्डी ),यांचे कीर्तन होईल.
ता.१७ रोजी ह.भ.प.नाथामहाराज मोरे (ताजे ) यांचे प्रवचन होकीर्तनईल ;तर ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी ) यांचे होईल.

 

मंगळवारी ता.१८ रोजी सकाळी ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल..काल्याचे महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.नवमी भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.काळुराम देशमुख , सचिव ह.भ.प. प्रकाश महाराज गोणते आणि श्री आखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष ॲड.माधवराव भोंडे , कार्याध्यक्ष दत्ताञेय येवले यांनी प्रसिद्धीस दिले आहे… .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!