आरोग्य व शिक्षण

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा मेळावा उत्साहात संपन्न

विभागप्रमुख यांना नियुक्ती पञे प्रदान

Spread the love

लोणावळा : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा मेळावा उत्साहात संपन्न ;सभासद , विभागप्रमुख यांना नियुक्ती पञे प्रदान कार्यक्रम हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड चे संघटक सुनिल घनवट , वैराग्यमुर्ती ह.भ.प.शंकरमहाराज मराठे, देवराईचे अध्यक्ष सुकनशेठ बाफना , मावळ तालुका दिंडी समाजचे सेक्रेटरी तुकाराम गाडे , कुंभार समाज जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार आणि राजस्थान चे वारकरी सांप्रदाय चे प्रदेशाध्यक्ष श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास (पुरोहीत ) यांचे हस्ते झाले.

यावेळी जेष्ट सामाजिक कार्यकर्ते भास्करराव खैरे तसेच वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास पडवळ , कार्याध्यक्ष शिवाजी पवार ,संत सेना महाराज दिंडी समाजचे अध्यक्ष गणपत पवार , सदस्य शांताराम गायखे, भिवाजी गायखे, विविध गावातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी सत्यनारायण पूजा ,दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच प्रमुख वक्ते सुनिल घनवट व रमेशचंद्रजी व्यास यांची भाषणे झाली.स्पर्श हाॕस्पिटलचे डाॕ.जनसनसर आणि सोनल शेलार यांचे आरोग्राबाबत मार्गदर्शन तसेच मान्यवरांचे हस्ते नियुक्ती पञे प्रदान कार्यक्रम झाला.

यावेळी सुनिल घनवट यांनी हिंदूंच्या श्रध्दास्थानाबाबत तसेच मंदिरांना सरकारीकरण करण्याचा देशात ठराव झाला. साडेचारलाख मंदिरे सरकारी करण्यासाठी प्रयत्न झाले. पैसा , सोने ,चांदी याबाबत मोठ्या मंदिराचे सरकारीकरण करून सरकार हिंदूंच्या श्रध्दास्थानावर गदा आणत आहे. माञ हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्माचे बाबत सरकार ब्र काढत नाही. जगात भारत हेही एकमेव हिंदूराष्ट्र आसताना त्याला सेक्युलर देश घोषित करून हिंदूंच्या भावनांचा अपमान करत आहे.

असे सांगून घनवट म्हणाले , पंढरपूर येथील गोशाळेची जमिन हडप करण्याचा प्रयत्न होता. काही वारकरी , ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले , ह.भ.प.इंदुरीकर यांनी जोर लावल्यानंतर ही नव्वद टक्के जमिन परत देवस्थान ला मिळाली. काही वर्षापूर्वी येथील गोशाळेची दुरावस्था व गायी कत्तलखान्यात दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. सरकार चर्च,मशीद व मदरसे यांचेबाबत मवाळ धोरण स्विकारत आसल्याने आज विशाळगडावर त्यांची मशीद दोन मजली तर सव्वाशे मुस्लिम वस्ती झाली ,तर हिंदू घरे बारा पंधरा राहिली आसून बाजीप्रभु देशपांडे यांची समाधी उघड्यावर आहे!याबाबत लक्ष घालून सर्व कीर्तनकार यांचेकडून किमान दहा मिनिट हिंदूंच्या हितासाठी प्रबोधन करावे, असे घनवट म्हणाले.

यावेळी ह.भ.प.रमेशचंद्रजी व्यास यांनी वारकरी यांनी समाजात कसे राहावे. व्यापार , श्रवण , प्रवचनांचे माध्यमातून आपले आयुष्य सुखी करावे. वैराग्यमुर्ती ह.भ.प. शंकरमहाराज मराठे म्हणाले , वारकरी सांप्रदायाचा विकास होण्यासाठी नित्य हरिपाठ , देवपूजा , तसेच नितीमत्तेने वागावे. कपाळावर गंध , गळ्यात तुळशीची माळ तसेच आषाढी कार्तिकी पंढरपूर , आळंदी , देहू ची पायी वारी करावी , आसे ते म्हणाले . यावेळी विभाग प्रमुख गणपत पवार, तसेच सदस्य रामदास काळे,सुरेश केदारी , तसेच मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!