ताज्या घडामोडी

आरग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच महिलांना न्याय मिळाला. महिलांचे मुक्तिदाते म्हणून डॉ. आंबेडकरांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून व भाषणातून ते नेहमीच प्रेरणा देत राहतील असे प्रतिपादन झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांनी केले. झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग व प्रगतिशील लेखक संघ जिल्हा सांगली यांच्या विद्यमाने ( आरग तालुका मिरज जिल्हा ) सांगली येथे संस्थेच्या कार्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या . संस्थेच्या कार्यालयाबरोबरच आरग येथे असणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थिस्मारकासही महिलांनी अभिवादन केले.यावेळी संस्थेच्या सचिव अधिका बाबर , नंदिता खटावे यांच्यासह कांचन जाधव, सरोजिनी कुंभार, मिराबाई कांबळे, शारदाबाई कांबळे , जयश्री कांबळे, कल्पना किनिंगे, नंदा कांबळे यांच्यासह अन्य सदस्य व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!