ताज्या घडामोडी

शौचालयाच्या चेंबरची टाकी फुटल्याने वाशीनाका भागात रोगराईची भीती

Spread the love

मुंबई – चेंबूरमधील वाशीनाका येथील अयोध्या नगर भरत कुंज सोसायटी आणि जय भवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या एमएमआरडीए इमारतीच्या शौचालयाच्या चेंबरची टाकी फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.पालिका याकडे दुर्लक्ष करत स्थानिक रहिवाशांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागील सहा दिवसांपासून या शौचालयाच्या टाकीतून मैलाची गळती होऊन परिसरात दुर्गंधी जाणवत आहे.याबाबत स्थानिक सोसायटीचे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना लेखी कळवूनही दखल घेतली गेलेली नाही. तरी सध्या आधीच कोरोनाची भीती असताना आता या नवीन संभाव्य रोगराईच्या भीतीने याठिकाणचे रहिवासी ट्रस्टचे झाले आहेत.त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पालिकेच्या या नाकर्ते भूमिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!