आरोग्य व शिक्षण

प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या भेटीनिमित्ताने लायन्स क्लब सुप्रीमोजच्या वतीने विविध उपक्रम  

Spread the love

लोणावळा : लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक यांनी लायन्स क्लब लोणावळा सुप्रिमोजला भेट दिली. त्या भेटी निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोजच्या वतीने आतवण येथील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थिनींना कपडे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल चे संस्थापक मेलविन जोन्स तसेच स्व. मर्जिया वाडीवाला आदित्य लोहार यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून विद्यार्थ्यांसोबत जन्मदिन साजरा करण्यात आला.

रायवुड लोणावळा येथील कब्रस्तान जवळील कम्युनिटी हॉल करता अमिन वाडीवाला यांच्याकडून सुन्नी मुस्लिम जमातचे हाजी इर्शाद पटेल  व शफिक अत्तार यांच्याकडे प्रांतपाल हेमंत नाईक व सुप्रीमो अध्यक्ष सुधीर कदम यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच अमिन वाडीवाला यांच्याकडून रोख स्वरूपात कंचन गुप्ता या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी मदत देण्यात आली व गरजू महिलेला हिवाळ्यातील उपयोगी वस्तूंचे जम्बो कीट प्रदान करण्यात आले.

लोणावळा नगरपरिषद येथील छोटेखानी कार्यक्रमात नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना मास्क सनिटायझर तसेच महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे 6 वॉटर फिल्टर प्रांतपाल यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले .तसेच गरजू बांधकाम मजुरां करिता टी-शर्ट तसेच अंधशाळा खंडाळा येथील अन्नदान व एलसीएफ फंड निधीचा धनादेश याप्रसंगी प्रांतपालांकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी अमीन वाडीवाला, सुरैय्या वाडीवाला,अॅड. धनराज वंजारी, डॉ. अमोल आगरवाल, विश्वनाथ पुट्टोल, रंजना पुट्टोल, जयराम गौडा, विद्या गौडा, रेखा मातेरे, उदय शेट्टी, गिरीश पारख ,डॉ. सुमित सोलंकी, अपूर्वा लोहार, गार्गी कुटे, शौर्य पुट्टोल, धीरेंद्र चौकिकर, नमिता कदम, सचिन कुटे, पल्लवी शेट्टी, यशश्री तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!