महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या “रोटरी इंटरनॅशनल” स्थानिक शाखेचा सहावा वर्धापनदिन संपन्न

Spread the love

तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी या “रोटरी इंटरनॅशनल”च्या स्थानिक शाखेचा सहावा वर्धापनदिन व संस्थापक विलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बुधवार (दि.१४) सायंकाळी ४:३० वा. “आत्मनिर्भर दिव्यांग व कोरोना योद्धा” सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व प्रा.महादेव वाघमारे यांना “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरविण्यात आले.तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून विलास काळोखे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्टचे विशेष उपक्रमांचे अध्यक्ष रो. दिलीप देशपांडे,रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे,रोटरी सिटीचे अध्यक्ष राजेश गाडे-पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,पोलीस निरीक्षक शहाजी पवार, परिवहन खात्याचे निवृत्त अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, तळेगाव एमआयडीसी संस्थापक संतोष खांडगे, दिलीप पारेख,संजय मेहता,मनोज ढमाले,संतोष शेळके,किरण ओसवाल, बाळासाहेब रिकामे,डॉ. मिलिंद निकम,संजय चव्हाण,भगवान शिंदे,विश्वास कदम,राजू कडलक,शरयू देवळे,रिझवाना शेख,सुरेश दाभाडे,प्रशांत ताये,विनय दाभाडे,मिलिंद शेलार इत्यादी रोटरी सिटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रशीदा गलगले या दिव्यांग महिलेला आत्मनिर्भर होण्यासाठी २५,००० रुपयांची अत्याधुनिक शिलाई मशीन देण्यात आली.यावेळी रशीदा गलगले म्हणाल्या “कोरोनाच्या काळात जगण्याला आधार मिळाला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे मी खूप आभारी आहे”.

रोटरी डिस्ट्रिक्टचे विशेष उपक्रमांचे अध्यक्ष दिलीप देशपांडे म्हणाले हास्याने ऑक्सिजन वाढते पण समोरच्याला हरवल्याने समाधान मिळते.रोटरी माणूसकी जिवंत ठेवण्याचे काम करत आहे.मागणाऱ्या हातांना काम दिल्यावर तो आत्मनिर्भर होतो.रोटरी माणसाचे आयुष्य घडविते.”

संस्थापक विलास काळोखे म्हणाले “समाजातील गरीब गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.माणसाने माणसाच्या मदतीला जाणे हीच माणूसकी आहे. समाजाची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे समाधान वाटते.”

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, राजेश गाडे-पाटील,डॉ. दिलीप देशपांडे,प्रा.महादेव वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मेहता यांनी केले. सूत्रसंचालन दीपक फल्ले यांनी केले. आभार किरण ओसवाल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!