ताज्या घडामोडी

मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Spread the love

सालाबादाप्रमाणे सिल्लोड तालुक्यातील श्रीक्षेत्र मंगरूळ येथे मांगीर बाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त मांगीरबाबाच्या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.सदरील यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन अनेक भाविक भक्त पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून दर्शनासाठी येत असतात.
यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मानवहीत लोकशाही पक्ष सिल्लोड तालुका पदाधिकारी यांच्या वतीने सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक येथे फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिंडीतील प्रमूख भावीक यांचा सत्कार करण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे अभिवादन केल्यानंतर दिंडी मंगरूळकडे रवाना झाली.
यावेळी अब्दुल सत्तार यांचे पि ए फईम पठाण, मानवहीत लोकशाही पक्ष औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस राजू साठे, सिल्लोड तालुका संपर्कप्रमुख सखाराम अहिरे ,सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे, सोशल मीडिया अध्यक्ष संजय कांबळे, तालुका सल्लागार दिपक दनके, तालुका संघटक मधुकर कांबळे, युवा तालुका सहसचिव नितीन दनके आदी समाजबांधव व मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!