महाराष्ट्र

दानोळी-येथील शिवाजी चौकामध्ये शिवजयंती साजरी

Spread the love

.यावेळी शिव प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. सुनिता वाळुंकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवाजी चौकातील भगव्या ध्वजास पुष्पहार अर्पण करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा दानोळी ग्रामपंचायत यांना भेट म्हणून देण्यात आली. तसेच दानोळी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये ही ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान शिवजयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी मा. शिरोळ ता.शिवसेना प्रमुख सतीश मलमे, महादेव धनवडे, राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शुभांगी शिंदे, सर्जेराव शिंदे, गुंडू दळवी, बापुसो दळवी, उपसरपंच विपुल भिलवडे, ग्रा. स. सुनील शिंदे, दादा खोत, रोहित धनवडे, श्रावण कांबळे, गोपाल माने, संगीता बोरचाटे, सुरेखा कुरणे, पिंटू गावडे, माणिक जगदाळे, अण्णासाहेब पाटील, अरुण होगले, यांच्यासह शिवभक्त व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!