ताज्या घडामोडी

उध्दव ठाकरे यांना राज्यातील वडार समाजाचा जाहीर पाठींबा

Spread the love

संघटनेच्या बैठकीत
एकमताने ठराव मंजूर

मुंबई – सध्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून शिवसेनेतही अस्थिरता निर्माण झाली आहे.त्यातच या बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांना काही मराठा संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील तमाम वडार समाज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची घोषणा अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी केली आहे.तसा ठरावच संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे.

शिवसेना ही नेहमीच वडार समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढत आलेली आहे. हे शिवसेनेने वडार समाजासाठी काम आम्ही कदापि विसरू शकत नाही, सध्याच्या परिस्थितीत वडार समाज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, असे अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.तसेच लवकरच उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्रही दिले जाणार आहे. राज्यातील बहुसंख्येने असलेल्या वडार समाजाच्या पाठीशी उभे राहून शिवसेनाप्रमुख दिवंगत हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी रस्त्यावरील लढा अथवा प्रशासकीय कामकाजामध्ये साथ दिली आहे. वडार समाज हे त्यांचे बहुमोल योगदान कदापि विसरू शकत नाही.त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठींबा देण्याचा ठराव नुकताच संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती दिपकदादा शिंदे यांनी या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!