आरोग्य व शिक्षण

चिंचेवाडी येथे पाणीटंचाई.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिंचेवाडी ता शिराळा येथे पाण्यासाठी नागरिकांची ऐन उन्हाळ्यात भटकंतीसुरू आहे.नागरिक शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या स्किम तसेच गावातील बोअर मधून पाणी आणत आहेतपंधरा दिवस गावाला पाणीपुरवठा नाही.त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी महिला व नागरिकांची वणवण सूरू आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअर चा विद्युत पंप खराब झाला.त्या मुळे पाणी पुरवठा बंद.
पर्यायी विद्यूत पंपाची व्यवस्था ग्रामपंचायत करणे गरजेचे आहे. गावची लोकसंख्या पंधराशे आहे.
विद्युत पंप सुरू झाला तर पाईप लाईन फुटली आहे.
पाणी पुरवठा बंद आहे.पंधरा दिवस पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
या बाबत ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत.
अजूनही पाणी पुरवठा योजना बंद आहे.
नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही.गावातील धार्मिक कार्यक्रम पाणी नाही.वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!