ताज्या घडामोडी

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ यांच्या वतीने जागतिक अहिराणी दिनानिमित्त महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती व जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न

Spread the love

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अहिराणी भाषा दिनानिमित्त महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती व जागतिक महिला दिन कल्याण येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील साहेब यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर,कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर,उपाध्यक्ष एल.आर.पाटील,प्रदीप अहिरे,एन.एम.भामरे सर व प्रा.प्रकाश माळी सर तसेच खजिनदार आप्पासाहेब अर्जुन पाटील व महिला आघाडी प्रमुख सौ.भारती वानखेडे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली.प्रमुख पाहुणे सर्जेराव पाटील यांच्यासह अहिराणी भाषा अभ्यासक प्रमुख वक्ते व ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब हटकर तसेच एल.आर पाटील,अर्जुन पाटील,प्रदिप अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.एन.एम.भामरे सरांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील,महिला आघाडी प्रमुख सौ.भारती वानखेडे,सचिव सौ.वर्षा पाटील कार्याध्यक्ष सौ.आशा भामरे तसेच मंडळाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महिला दिनानिमित्त महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आनंद घेतला.कार्यक्रमाचे स्वागत गीत विद्या अहिरे,धनश्री बुवा व हर्षला शिणकर यांनी सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा पाटील आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैदेही पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!