आरोग्य व शिक्षण

कुसगाववाडी येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २१नोव्हेंबर रोजी काकडाआरती सांगता व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन

Spread the love

लोणावळा : कुसगाववाडी येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर काकडाआरती सांगता सोहळा व कलशारोहन सोहळा संपन्न होणार आहे.

१९ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता काकडाआरती , दुपारी ३ ते ६ कळस मिरवणूक होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हरिपाठ होईल.२० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता काकडाआरती , सकाळी साडेआठ ते साडेअकरा होमहवन व पूजा अभिषेक तसेच वैराग्यमुर्ती शंकरमहाराज मराठे यांचे हस्ते कलशारोहन होईल. दुपारी २ ते ४ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता हरिपाठ होईल. राञी ७ वा. ह.भ.प.शिवलीला ताई पाटील (बार्शी ) यांचे किर्तन होईल.राञी महाप्रसाद व १० नंतर भजन होईल. ता.२१ रोजी ह.भ.प.निलेश महाराज कोरडे (पुणे ) यांचे सकाळी साडेनऊ ते साडेअकरा काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर काल्याचा महाप्रसाद व सायंकाळी ५ वाजता हारांची विसर्जन मिरवणूक होईल, असे कुसगाववाडी येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर , समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे. काकडाआरतीसाठी लोकांची सध्या वारकरी व महिला वारकरी यांची गर्दी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!