आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सोमाटणे टोलनाका हटाव .बैठकीचे नियोजन..

 टोलनाका वसुली एजंट व टोलनाक्याचे समर्थन करणाऱ्यांनी बैठकीला येऊ नये.

Spread the love

सोमाटणे टोलनाका हटाव .बैठकीचे नियोजन..टोलनाका वसुली एजंट व टोलनाक्याचे समर्थन करणाऱ्यांनी बैठकीला येऊ नये..Removal of toll booths.Planning of meeting..Toll booth collection agents and toll booth supporters should not come to the meeting.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ५ मार्च.

बेकादेशीर व अनाधिकृत सोमाटणे टोलनाक्या विरोधात आपण वेळोवेळी आवाज उठविला आहे. आंदोलनही केली आहेत “सामूहिक प्रयत्नांना यश येऊ पाहत आहे. पण टोलनाका व्यवस्थापन प्रशासनाला, हाताशी धरून अनधिकृत टोलनाका बंद करायला तयार नाही. यामुळे मावळ व परिसरातील जनतेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे.

यापुढेही आपला लढा थांबणार नाही.सोमाटणे टोलनाका कायमचा बंद होणे गरजेचे आणि अत्यावश्यक आहे.
त्यासाठी पुढील भुमिका ठरविण्याकरिता, सर्वसामान्य नागरिकांना,सामाजिक संस्थांना, राजकीय प्रतिनिधींना, सजग नागरिक तसेच व्यापारी बंधूंना, रविवार ,दिनांक ५मार्च रोजी सकाळी११.०० वाजता, तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडी येथे विठ्ठल मंदिरात बैठकीला येण्यासाठी आवाहन करीत आहे,आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती, जनसेवा विकास समितीचे,संस्थापक : किशोर आवारे यांनी म्हंटले आहे.

 

तसेचटोलनाका वसुली एजंट व टोलनाक्याचे समर्थन करणाऱ्यांनी बैठकीला येऊ नये, असे देखील नमुद केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!