आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मार्फत ई बाईक Expo..

ई. बाईक च्या वापरामुळे निश्चितच इंधनासाठी होणाऱ्या खर्चामध्ये बचत होऊ शकते.

Spread the love

ई. बाईक च्या वापरामुळे निश्चितच इंधनासाठी होणाऱ्या खर्चामध्ये बचत होऊ शकते.E Bike Expo through Talegaon Dabhade Municipal Council..E. Using a bike can definitely save you money on fuel.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर ४ मार्च.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ३.० च्या अंतर्गत ई वाहन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देणेसाठी व शहरामध्ये पारंपारिक वाहनांच्या वापरामुळे होणारे हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण यामध्ये होत असलेली वाढ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे अत्यावश्यक झाले आहे, म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद व अर्णव ई – स्कूटर शोरूम सिटी ई- बाईक शोरूम व सुस्को युनिकॉर्न प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित शोरूमच्या संयुक्त विद्यमाने ई- बाईक कॅम्प आयोजित केला असून ई बाईक च्या वापरामुळे निश्चितच इंधनासाठी होणाऱ्या खर्चामध्ये बचत होऊ शकते.

त्याचबरोबर या कॅम्पमध्ये वाहन खरेदी करणाऱ्यास शोरूम तर्फे बाजारभावापेक्षा र.रु.५,०००/- ते
र.रु.७,०००/- पर्यंत भरघोस सूट देण्यात येणार आहे.
नागरिकांना वाहन खरेदी करण्यासाठी फायनान्सची आवश्यकता असल्यास कॅम्पच्या ठिकाणीच शहरातील बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एच.डी.एफ.सी. बँक यांचे
प्रतिनिधी उपस्थित राहतील. व सवलतीच्या व्याजदरामध्ये पात्र नागरिकांना ई-बाईक खरेदीसाठी फायनान्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रत्येक ई-बाईक खरेदी करणाऱ्या नागरिकास रस्ते सुरक्षा विषयक प्रोत्साहन म्हणून,मोफत हेल्मेट तसेच आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रत्येक ई-बाईक खरेदी करणाऱ्या नागरिकास तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पर्यावरण दूत म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

सदरचा कॅम्प हा दिनांक ८ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ दरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,जास्तीत
जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!