आरोग्य व शिक्षण

श्रीराम नवमी निमित्ताने लोणावळ्यात गवळीवाडा , भांगरवाडी , कुसगाववाडी येथे मंदिरात गर्दीचा उच्चांक

Spread the love

लोणावळा  : राम जन्मला ग सखे , राम जन्मला , , ! ! प्रभु श्रीरामचंद्र की जय ! ! सियावर रामचंद्र की जय ! ! , अशा घोषणांनी आज गवळीवाडा मंदिरात भाविकांकडून मर्यादा पुरूषोत्तम प्रभुराम जन्माचे निमित्ताने तासभर भजन , नंतर श्रीरामजन्माचा अध्याय वाचन झाले. नंतर आरती , पाळणा , सुंटवडा वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी लोणावळ्याच्या सर्व भागातील भाविकांकडून गवळीवाडा , भांगरवाडी येथील व कुसगाववाडी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या.गवळीवाडा येथील मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युतरोषणाई करून सजावट केली होती..यावेळी श्रीराम मारूती सेवाभावी ट्रस्टचे व श्रीराम क्रीडा मंडळांच्यावतीने थंडगार सरबत वाटप करण्यात आले..तसेच वारकऱ्यांचे करीता पुरणपोळी जेवण , तसेच भाविक भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था केली होती.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , निखिल कविश्वर , माजी नगरसेवक भिकुदादा तथा दिलीप लोंढे , माजी नगराध्यक्ष राजूशेठ गवळी , माजी उपनगराध्यक्षा सुवर्णाताई आकोलकर , सिंधूताई कविश्वर , श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महादुशेठ गवळी , संजय गवळी , शञुघ्न खंडेलवाल , दर्शन लोंढे , संदिप लोंढे , मनोज दत्ताञेय गवळी , श्री.पिंगळे तात्या तसेच अनेक मान्यवर यांचेतर्फे आणि क्रीडा मंडळ व ट्रस्टच्यावतीने दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक सहकार महर्षी माऊली दाभाडे , माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , माजीउपनगराध्यक्क्षा पूजा गायकवाड , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , पदाधिकारी धनंजय काळोखे , आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!