आरोग्य व शिक्षणमावळ

जागतिक फार्मसिस्ट दिवस तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा.

इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशन, सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसिस्ट दिवस संपन्न.

Spread the love

जागतिक फार्मसिस्ट दिवस तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा.World Pharmacist Day celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ सप्टेंबर.

इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशन, सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसिस्ट दिवस तळेगाव दाभाडे येथे साजरा करण्यात आला.

सर्व फार्मसिस्ट बंधू भगिनींना त्यांच्या केमिस्ट स्टोअर येथे जाऊन गुलाब पुष्प व प्रशस्ती पत्रक देऊन फार्मसिस्ट दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. इ सी मेंबर सुरेशशेठ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत कॉलेज च्या प्राध्यापिका श्वेता मंत्री (मणियार ),केमिस्ट असोसिएशन तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष प्रमोद दाभाडे,मावळ तालुका सचिव आशिष काणे,खजिनदार नेमिचंद गुंदेशा,धर्मेश पटणी, प्रदीप मुंगसे,संतोष शाह, गौरंग मेहता व फार्मसी कॉलेज चे विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभागी झाले.

प्रमोद दाभाडे यांनी आरोग्य विभागातील एक महत्वाचा घटक फार्मसिस्ट , कोरोना काळ असू किंवा दुसरी कसली आपत्ती नेहमी मदती ची भावना ठेऊन पुढे राहिलेला अश्या माझ्या सर्व फार्मसिस्ट बंधू भगिनींना फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्या दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!