आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

आठवडेबाजार बंद असल्याने लोणावळा पवनारस्त्यावरच विक्रेत्यांनी थाटला बाजार..

भांगरवाडी येथील भुयारी गटाराचे काम सुरू असल्याने मागील शुक्रवारी व या शुक्रवारी बाजार बंद ठेवल्याने ग्राहकांनी भाजी खरेदी कुठे करायची ? तसेच भाजी कुठे विकायची हा प्रश्न ग्राहकांच्यावतीने व भाजी विक्रेते यांचेकडून विचारला जात आहे .

Spread the love

आठवडेबाजार बंद असल्याने लोणावळा पवनारस्त्यावरच विक्रेत्यांनी थाटला बाजार..

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी, १० फेब्रुवारी.

लोणावळा येथील शुक्रवारी असलेला बाजार बंदमुळे लोणावळा पवनानगर रस्त्यावर भाजीबाजार ;ग्राहकांनी खरेदी करण्याचा आनंद घेतला.
भांगरवाडी येथील भुयारी गटाराचे काम सुरू असल्याने मागील शुक्रवारी व या शुक्रवारी बाजार बंद ठेवल्याने ग्राहकांनी भाजी खरेदी कुठे करायची ? तसेच भाजी कुठे विकायची हा प्रश्न ग्राहकांच्यावतीने व भाजी विक्रेते यांचेकडून विचारला जात आहे. भांगरवाडी येथे जाण्यायेण्यासाठी पायीच जाणेयेणे नागरिक करत होते.

या ठिकाणी डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मैदान , रायवूड पार्क हे पर्याय आसूनही नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांनी मागील शुक्रवारी व या शुक्रवारी आठवडेबाजार बंद ठेवला .त्यामुळे शेकडो नागरिकांकडून कडक बाजारामुळे भाजीमंडईतील भाजी खरेदी करावी लागली.
रेल्वे मैदान , तुंगार्ली येथील मैदान तसेच गवळीवाडा येथील क्रीडांगण आदी पर्यायी व्यवस्था वलवण नांगरगाव रोडचा पर्यायही न स्विकारता नगरपरिषद प्रशासनातर्फे चक्क दोन्हीही शुक्रवारी आठवडेबाजार बंद ठेवल्याने नगरपरिषदेकडे भाजीबाजार मधून मिळणारे पावती प्रमाणे उत्पन्न बुडाले..
पूर्वी पन्नास रूपये आसलेली भाड्याची जागा आता काही आठवडेबाजार येथून प्रत्येकी दोनशे रूपये भाडे भाजीविक्रेते यांचेकडून घेतले जात होते.त्यामुळै काही भाजीविक्रेते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!