ताज्या घडामोडी

कास्ट्राईब माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचा जिल्हा मेळावा १७ रोजी रत्नागिरी येथे आयोजन

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा भव्य जिल्हा मेळावा रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य मेळाव्याला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार सचिव आकाश तांबे, महासंघ रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कांबळे, संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद कदम उपस्थित राहणार आहेत.सदरचा मेळावा कास्ट्राईब संघटनेचे  जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
मेळाव्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील होणारे अन्याय, शासनाचा शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संघटनेची भूमिका, नवनियुक्त व निवृत्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवाय गुणवंत-यशवंत पाल्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सक्रिय सदस्य मेहनत घेत आहेत.
तरी या वार्षिक भव्य जिल्हा मेळाव्याला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे  जिल्हा सचिव विनोद सांगावकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!