आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

२४ वर्षीय अविवाहित तरुण १२०० फुटांपेक्षा जास्त खोल दरीत पडुन दुर्दैवी अंत.

नाणेघाट सर्च ऑपरेशन करून, स्थानिक नागरिक, मृतांचे नातेवाईक, पोलीस, अधिकारी, व शिवदुर्ग टिमला बॉडी वर घेण्यात यश ..

Spread the love

२४ वर्षीय अविवाहित तरुण १२०० फुटांपेक्षा जास्त खोल दरीत पडुन दुर्दैवी अंत.

नाणेघाट सर्च ऑपरेशन करून,  शिवदुर्ग टिमला बॉडी वर घेण्यात यश ..

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २० जानेवारी.

मनेश गोरख जठार मु.पो.लोणी व्यंकनाथ,
ता-श्रीगोंदा,जि-अहमदनगर दि.११ जानेवारी २०२३ पासून घरामधुन बेपत्ता आहे त्याची गाडी व शेवटचे लोकेशन नाणे घाट मध्ये १२ जानेवारीला मिळाले होते. पोलिसांनी नाणेघाटातील सर्व ठिकाणी स्वतः व वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुप मार्फत शोध घेतला, परंतु कुठल्याही प्रकारची ठोस माहिती मिळाली नाही.

१८ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता आमदार अतुल बेनके साहेबांच्या ऑफिसमधून शिवदुर्गला मदतीसाठी फोन आला. हरवलेल्या मुलांचे नातेवाईक पण बरोबर होते. दुपारच्या नंतर जाऊन उशीर होणार व काम होणार नाही म्हणून आम्ही उद्या सकाळी १९.१. २०२३ रोजी लवकर पोहचून शोध मोहीम करु असे सांगितले.
रात्री साहित्याची जमवाजमव केली.टॉर्च, वॉकी , कॅमेरा चार्ज करुन ठेवले, टेक्नीकल व साहित्य, व बॉडी पॅकिंगसाठी साहित्य बरोबर घेतले सकाळी ५.३० ला टिम जुन्नरच्या दिशेने निघाली . साडे तीन तासाचा प्रवास होता . त्याप्रमाणे पोहचले.

रात्री नातेवाईकांनी फोन केला होता खरच तुम्ही ८.00-९.00 वाजता येणार का ??अशी खात्री केली. साहजिकच आहे आठ दिवस शोधाशोध केल्यावर अशी प्रतिक्रिया येऊ शकते. नाष्टा करून जागेवर पोहचलो . नातेवाईक बरोबरच होते. बोलता बोलता केस संदर्भातील सर्व चर्चा केली. गाडी कुठे सापडली, काही सिसी टिव्ही फुटेज पाहिले. व संशयास्पद जागेची पाहणी करण्यासाठी विरुद्ध दिशेला दुर्बिण घेऊन टिम पाठवली . दुसरा गट कुठे कुठे शोध घेतला व काय साहित्य सापडले यावरुन एक जागा निश्चित केली. व कामाला सुरुवात झाली साधारणपणे ९.३० ला.
साहित्य काढणे वॉकीचे चॅनल सेट करणे, ॲंकर पॉईंट फिक्स करणे व खाली कोण उतरणार वर कोण थांबणार, कोणी काय करायचे सर्व ठरले खाली जाणारा व वर थांबून पाण्याची व्यवस्था करणारा यांच्या कामाला सारखेच महत्त्व असते. त्यामुळे ते लिडर ठरवतात कोणी काय करायचे आहे. व काम चालू झाले. सुरवातीला योगेश उंबरे एक हजार फुट खाली दरीमध्ये रॅपलींग करुन गेला . नंतर सिध्दार्थ आढाव मदतीला गेला . संशयास्पद वाटणाऱ्या खाणा खुणा शोधल्या जे स्पष्ट पांढऱ्या रंगाचे दिसत होते ती बॉडी नव्हती . पण जवळच एक मार्क होता त्याला फॉलो केल्यामुळे एक काळी पॅन्ट व ओळखपत्र सापडले .व तपासाला दिशा मिळाली. जी पॅन्ट मिळाली ती या मुलाचीच होती खात्री झाली. मग वास यायला लागला पण बॉडी दिसत नव्हती थोडे अजून शोधाशोध केल्यावर त्याच लाईन मध्ये खाली शर्ट सापडला व नंतर बॉडी दिसु लागली साधारणपणे दुपारी 12.00 वाजता. पण रोप कमी असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नव्हते.
नवीन ठिकाणी अशा शोध मोहिमा करताना लूज रॉक मूळे अपघात होतात.आपल्या अजूबाजूने मोठ मोठे दगड गोटे जातात. बॉर्डर वरील युध्दासारखा प्रसंग असतो . आपला जीव वाचवायचा असतो. त्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

आता पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन बॉडी वर घ्यायची होती , बॉडी पॅकिंग साठी मेडीकल ग्लोज, प्लास्टिक, स्ट्रेचर ,रोप, खाणे पिणे साहित्य हे सर्व घेऊन रतनसिंग याला खाली पाठवले .बॉडी खाली गावात घेऊन जाता येईल का ? कि वर खेचून घेणे सोपे जाईल यावर स्थानिक लोकांशी चर्चा केली व अंतर मोठे असल्याने दोन टप्प्यांत वर ओढून घेण्याचे ठरले व सगळी जुळवाजुळव करुन अथक परिश्रमाने बॉडी ठिक 04.00 वाजता वर आली. त्यानंतर सेट अप काढणे, रोप कॉईल करणे खाली गेलेली टिम परत सुखरूप वर येणे याला साडे पाच वाजले. टिमचे सर्व जण सहा वाजता एकत्र जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो.
बॉडी खेचून घेण्यासाठी स्थानिक नागरिक, मृतांचे नातेवाईक, पोलीस, अधिकारी, व टिमचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिवदुर्गची टिम योगेश उंबरे ,महेश मसने, सिध्दार्थ आढाव, समीर जोशी,रतन सिंग,सिध्देश निसाळ अमोल सुतार,अनिल आंद्रे, सागर कुंभार व सुनिल गायकवाड
स्थानिक जुन्नर चे प्रशांत कबाडी, साईनाथ कबाडी संतोष कबाडी, यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिवदुर्गची कामगिरी पाहुयात व्हिडिओ मध्ये.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!