आंदोलनआपला जिल्हामहाराष्ट्रमावळ

मराठा आरक्षणास, तालुका काँग्रेस कमिटीचा पाठिंबा.

मावळ तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ व जिल्हा काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांच्या सहीने मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र तहसीलदार मावळ यांना देण्यात आले.

Spread the love

मराठा आरक्षणास , तालुका काँग्रेस कमिटीचा पाठिंबा.मराठा आरक्षणास , तालुका काँग्रेस कमिटीचा पाठिंबा.Taluka Congress Committee support for Maratha reservation.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी,१ नोव्हेंबर.

मावळ तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ व जिल्हा काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांच्या सहीने मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र तहसीलदार मावळ यांना देण्यात आले.

सकल मराठा समाजास, आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली, सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे, सदर उपोषणास महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा तर आहेच परंतु मावळ तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी पाठिंब्याचे पत्र मावळचे नायब तहसीलदार प्रसन्न केदारी यांना देण्यात आले.
मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मावळ तालुका काँग्रेस पक्ष मावळ तालुक्यातील सर्वच स्तरात व जनमानसात जाऊन त्रिव्र भावना व्यक्त करणारा असल्याचे जिल्हा काँग्रेसचे नेते रामदास आप्पा काकडे यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या तीव्र भावना लक्षात घ्याव्यात असे आवाहन तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले आहे.
बहुजनांना संकटाच्या काळात मराठा समाजाने मोठ्या मनाने, मदत केली असून, व्यवसाय ,शिक्षण ,आरोग्य, राजकारण, अधिक क्षेत्रामध्ये मराठा समाजाने बहुजनांना मोठ्या पदावर नेऊन ठेवले आहे, बहुजन समाज मराठा समाजाशिवाय अपूर्ण असल्याचे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले आहे.

तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार प्रसन्न केदारी यांनी निवेदन स्वीकारले असून सरकारला तालुका काँग्रेस कमिटीच्या भावना पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष प्रतिमा ताई हिरे, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, तळेगाव स्टेशन कार्याध्यक्ष योगेश पारगे, मावळ तालुका सरचिटणीस अनिस भाई तांबोळी, तळेगाव स्टेशन युवक अध्यक्ष समीर दाभाडे, वडगाव शहराध्यक्ष बाळासाहेब आबा चव्हाण, गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!