क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

कलापिनीत कोजागिरीच्या मनोरंजनाचे चांदणे उधळले…

वय वर्षे सात ते वय वर्षे पंच्याहत्तर अशा सर्व अबालवृद्धांनी सादर केलेल्या एकाहून एक सुंदर कलाकृतींनी कलापिनीची कोजागिरी पौर्णिमा मनोरंजनाचे चांदणे उधळत सादर करण्यात आली.

Spread the love

कलापिनीत कोजागिरीच्या मनोरंजनाचे चांदणे उधळले;
वय वर्षे सात ते वय वर्षे पंच्याहत्तर अशा सर्व अबालवृद्धांनी सादर केलेल्या एकाहून एक सुंदर कलाकृतींनी कलापिनीची कोजागिरी पौर्णिमा मनोरंजनाचे चांदणे उधळत सादर करण्यात आली.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ नोव्हेंबर.

शांभवी जाधव हिच्या जय शारदे वागेश्वरी या गीतावर केलेल्या सुंदर नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. त्यानंतर विवान रुपनवर याने सुरेल विंदेश्वरी स्तोत्र सादर केले. त्या पाठोपाठ अरुंधती देशपांडे यांचे उत्तम कविता रसग्रहण, गार्गी देशमुख हिची ठसकेबाज गवळण, स्वरा देशमुख ची हृदय हेलावणारी हिरकणी ही नाट्यछटा, मीरा कोण्णूर यांनी उत्कृष्ट वाचिक अभिनयातून सादर केलेल्या व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘असंच’ या कथेचे वाचन, ज्येष्ठ स्वास्थ योगी दीपक जयवंत यांचे बहारदार गीत सादरीकरण, सिरिषा महाजन हिने सादर केलेले सुरेख भरत नाट्य नृत्य, राखी भालेराव आणि दिपाली जोशी यांचे ‘सवांर लू’ या गाण्यावर केलेले उत्कृष्ट नृत्य, गीता वालावलकर यांचे मार्गदर्शक संदेश देणारी एकपात्री सादरीकरण, ऋतू वाबळे हिने ‘माझा लाडका देव बाप्पा’ या गाण्यावर केलेले सुंदर नृत्य अशा सुंदर सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. वंदना चेरेकर यांच्या मुक्या प्राण्यांवर दया करा ही स्वलिखित नाट्यछटा प्रेक्षकांची उत्तम दाद मिळवून गेली. ज्येष्ठ कलाकार श्री प्रकाशजी जकातदार यांनी माउथ ऑर्गन वर उत्कृष्ट सिने संगीत सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. स्पृहा सरवटेने सादर केलेले सुश्राव्य गीत ‘अच्युतम केशवम’,
अर्चना मरुगकर यांनी सादर केलेली उत्तम स्वरचित कविता आणि मुग्धा भालशंकर हिने सादर केलेले ‘माझे विद्यालय’ ही नाट्यछटा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.

कलापिनी कुमार भवन, महिला मंच आणि स्वास्थ्य योगातील ज्येष्ठ सदस्य अशा विविध वयोगटाच्या सदस्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने कोजागिरीचा कार्यक्रम चढत्या श्रेणीने रंगत गेला.ज्येष्ठ स्वास्थ्य योगी. दीपक जयवंत यांचा त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त गौरव करण्यात आला. त्यानंतर कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले.

केतकी लिमये यांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुसूत्रपणे केले. मीनाक्षी झेंडे आणि अर्चना मुरुगकर यांनी समयोचित उत्तम सूत्रसंचालन केले. अंजली सहस्त्रबुद्धे यांनी योग्य मार्गदर्शन करून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला. सुप्रिया खानोलकर, राखी भालेराव आणि दीपाली जोशी यांनी सुरेख मंच सजावट करून कार्यक्रमाला शोभा आणली. अभिलाष भवार यांनी उत्तम माइक व्यवस्था करून कार्यक्रम सुश्राव्य केला.

या कार्यक्रमाला डॉ. अनंत परांजपे, सचिव हेमंत झेंडे, कार्यकारणी सदस्य संजय मालकर आणि चेतन शहा उपस्थित होते. स्वादिष्ट दुग्धपानाने कलापिनीच्या कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाची गोड सांगता झाली आणि आठवणीत राहील असा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!