आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळ

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित टेरेस गार्डनिंग आणि शून्य माती संकल्पना कार्यशाळा संपन्न.

लायन्स क्लब येथे तळेगाव दाभाडे रोटरी तर्फे शून्य माती संकल्पनेची कार्यशाळा संपन्न झाली.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित टेरेस गार्डनिंग आणि शून्य माती संकल्पना कार्यशाळा संपन्न.Terrace Gardening and Zero Soil Concept workshop conducted by Rotary Club of Talegaon Dabhade concluded.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर २ नोव्हेंबर.

रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब येथे तळेगाव दाभाडे रोटरी तर्फे शून्य माती संकल्पनेची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या सौ सुप्रिया भिडे व डॉक्टर अनुराधा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण ८० निसर्ग स्नेही नागरिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. डॉक्टर अनुराधा उपाध्ये यांनी झाडांची निवड माती पाणी व प्रकाश नियोजन तसेच सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा वापर कसा करावा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तर  प्रिया भिडे यांनी गच्चीवरील बाग शून्य माती संकल्पना कंपोस्टिंग यावर प्रात्यक्षिक व सुयोग्य मार्गदर्शन केले. रोजच्या वापरातील ओला कचरा टाकून न देता त्यातूनच बाग कशी फुलवता येईल याचा त्यांनी अचूक दृष्टिकोन दिला.
कार्यशाळा झाल्यानंतर यामध्ये सातत्य रहावे म्हणून स्थानिक मार्गदर्शक  रूपक साने व  मंगेश जोशी यांनी सहभागींना पुढील वर्षभर मदत करण्याकरिता पुढाकार घेतला.कंपोस्टिंग व बागेसंदर्भातील लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ते रोटरीतर्फे सर्वांना सहकार्य करणार आहेत. रोटरी क्लब तळेगाव दाभाडे तर्फे सर्व सहभागींना कापडी पिशवी, कंपोस्ट, कोकोपीट व लवंग तुळस देण्यात आली.

प्रकल्प अधिकारी रोटेरियन राजू गोडबोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अध्यक्ष रो उद्धव चितळे यांनी रोटरीच्या कार्याविषयी सर्वांना माहिती दिली. पर्यावरण डायरेक्टर रो प्रसाद मुंगी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी सचिव रो. श्रीशैल मेंथे, रो विलास जाधव, रो संजय अडसूळ, रो मंगेश गारोळे, रो यादवेंद्र खळदे, शंकर जाधव, जयवंत देशपांडे , रो डॉ ज्योती मुंडर्गी, रो राजन आंब्रे, रो. धनंजय मथुरे , रो प्रमोद दाभाडे, ऋषिकेश कुलकर्णी व सर्व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अर्चना चितळे, कल्याणी मुंगी, दीपा कुलकर्णी , कीर्ती मोहरीर काजल गारोळे, रेणुका जाधव, संगिता जाधव, प्रसाद मुंगी, राजू गोडबोले या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!