ताज्या घडामोडी

अमळनेर शहरात मराठी नववर्ष दिन, गुढीपाडव्या निमित्त भव्य शोभायात्रा

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

या शोभायात्रेत विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटना तसेच सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदवला.आज चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा (बुधवार दि.२२ मार्च २०२३ ) रोजी सकाळी हिन्दू नववर्ष स्वागत समिती अमळनेर आयोजित हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा वर्ष १९ वे सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागत यात्रा आज उत्साहात संपन्न झाली..!

या यात्रेसाठी शहरवासियानी आपले प्रांगण झाडून, सडा शिंपडून, रांगोळ्या काढून, घरावर रोषणाई करून भव्य गुढी उभारून, यात्रेवर पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले, शिवाय मंगलवेश परिधान करुन सहकुटूंब व मित्रमंडळीसह या यात्रेत सहभागी होवून सर्वांनी शोभा यात्रेचा आनंद लुटला…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!