ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या नूतन हायस्कूल लोटेची विद्यार्थीनी प्रतीक्षा कांबळे व मार्गदर्शक शिक्षीका प्रेरणा मोरे मॅडम यांचा जिल्हा विज्ञान मंडळामार्फत सत्कार संपन्न

Spread the love

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सण २०२१-२२ मधील राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातुन नूतन माध्यमिक विद्यालय लोटेच्या प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या बॉटल ट्री गार्ड या प्रतिकृतीला तालुक्यात , जिल्ह्यात व राज्यात सुद्धा द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विज्ञान मंडळाचे कोषाध्यक्ष मोहन पाटील सर , खेड तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष – सुनिल देशमाने सर , लोटे हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार बसवंत सर , ज्येष्ठ शिक्षक अनिल जाधव सर , मंडळाचे प्रतिनिधी निलेश देवरुखकर सर या सर्वांच्या उपस्थितीत अनुक्रमे प्रतीक्षा कांबळे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तर मार्गदर्शक शिक्षिका मोरे मॅडम यांचा शाल सन्मानपत्र व वस्तूरूप पारितोषिकाने सत्कार करण्यात आला प्रसंगी तालुका , जिल्हा व राज्य स्तरापर्यंत यशाची गुणवत्ता कायम टिकवल्याबद्दल मंडळाच्या वतीने तसेच उपस्थित सर्व शिक्षक वृद्धांच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यापूर्वी सुद्धा विद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याला सहभाग घेतला होता तर घोषवाक्य , क्रीडा अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यालयाने यश कमावल्याबद्दल सुद्धा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण साहेब तसेच विस्तार अधिकारी विजय थोरे सर यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!