आरोग्य व शिक्षण

लायन्स क्लबच्या वतीने लोणावळ्यात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम

Spread the love

लोणावळा :  लायन्स क्लब लोणावला, लायन्स क्लब लोणावळा खंडाळा व लायन्स क्लब लोणावळा डायमंड या तीनही क्लबच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमा अंतर्गत डॉ.शाळीग्राम भंडारी यांच्या व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक स्त्रीत सुप्त स्वरूपात असलेल्या शक्तीला जागृत करण्यासाठी हा समारंभ लोणावळा नगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान  लायन्स क्लब लोणावळ्याच्या विद्यमान अध्यक्षा विजया खंडेलवाल यांनी भुषविले.तर समन्वयक  प्रांतीय अधिकारी  डॉक्टर सीमा शिंदे होत्या.  अध्यक्षा  खंडेलवाल यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

तळेगावचे योगा शिक्षक विठ्ठलपंत गोंधळेकर यांनी हास्य योगाची प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांची शारीरिक आणि मानसिकता प्रफुल्लित आणि प्रसन्न केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर रिजन चेअर पर्सन राजश्री शहा, झोन चेरमन  दाऊद घासरावाला यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

2021 च्या ऑल इंडिया मिसेस ॲड. साधना सोनवणे यांनी व्यक्तिमत्व विकास हा विषय आपल्या स्वतःच्या यशस्वी प्रवासाच्या माध्यमातून विशद केला.

कार्यक्रमाचे  प्रमुख वक्ते तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध लेखक  डॉ. शाळीग्राम भंडारी  आपल्या मनोगतात म्हणाले की, एकेकाळी पडद्यात राहणारी, माजघरात वावरणारी, स्वतःचं मन क्वचितच प्रगट करू शकणारी , सश्या सारखी घाबरट स्त्री आता मात्र ताठ मानेने उंबरठा ओलांडून सन्मानाने समोर येऊ लागली आहे. फक्त एक कन्या ,भगिनी, माता, सून अशा विविध नात्यातून निष्ठापूर्वक आपली भूमिका तिने जर निभावली तर ती केवळ आपल्या कुटुंबाची, समाजाची नव्हे तर संपूर्ण राष्ट्राची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकते. डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी  उदाहरण आणि अनेक अनुभव विविध काव्यपंक्ती व शेरोशायरीच्या माध्यमातून” जागर स्त्री शक्तीचा” हा विषय सोप्या शब्दात सांगीतला.

लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष  मनोज लुंकड आणि लोणावळा डायमंड क्लबचे ल अध्यक्ष अनिल गायकवाड, नगरसेविका आरोही तळेगावकर यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

प्रांतीय अधिकारी  डॉ. सीमा शिंदे यांनी  समारंभ अत्यंत यशस्वीपणे पार पाडला.  डॉ. सीमा शिंदे आणि  सुरूची  ख॔डेलवाल यांनी सूत्रसंचालन केले.  तस्नीम थांकरावाला यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर, नगरपालिकेतील स्त्री कर्मचारी आणि तीनही लायन्स क्लब सभासद ,पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!