महाराष्ट्र

आजपासून महिलांना ST प्रवासात ५० टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात आजपासून ५० टक्के सवलत मिळणार..

Spread the love

आजपासून महिलांना ST प्रवासात ५० टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी.50 percent discount on ST travel for women from today, order issued by the government     

महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात आजपासून ५० टक्के सवलत मिळणार.. Under Mahila Samman Yojana, women will get 50 percent discount on ST travel from today

आवाज न्यूज : महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी, १७ मार्च.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या २०२३-२४ या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार आता महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल ५० टक्के सवलत मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या या योजनेचं नाव महिला सन्मान योजना असं आहे. राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर झाला. त्यादिवशीच ही घोषणा करण्यात आली आहे. पण या घोषणेची अंमलबजावणी होण्यासाठीचा शासन आदेश  गरजेचे असते. आता अखेर हा शासन आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानुसार आज १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाची महिला सन्मान योजना सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल ५० टक्के सवलत मिळणार आहे.

या अगोदर देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांना विविध प्रकारच्या ३० सवलती देत आहे. यामध्ये विविध घटकांना प्रवासात काही प्रमाणात सवलत दिली जाते. त्याचे निकष ठरवण्यात आलेले आहेत. यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ही सवलत देण्यासाठी शुल्क प्रतीपूर्ती दिली जाते.

 

 

महामंडळ प्रवाशांना विविध प्रकारच्या ३० सवलती देत त्यामध्ये ३३ ते १०० टक्के पर्यंत प्रवासात सवलत देण्यात येते. जसे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त ७५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्यात आला आहे. त्याचबरोबर ६५ ते ७५ च्या दरम्यान वयाच्या नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जात आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास, दिव्यांगाना सवलत, शालेय मुलींना देखील प्रवासात सवलत एसटीकडून दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!