आरोग्य व शिक्षण

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक लवकरच होईल जाहीर

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणार्‍या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. साधारण १५ मे – १८ मे या दरम्यान वेळापत्रक जाहीर होईल व तसे वैयक्तिक संदेश प्राप्त होतील असे नियोजन केले असल्याचे समजते.

संपूर्ण महाराष्ट्रात (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ) राबविण्यात येणार्‍या प्रशिक्षणासाठी ५ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी झालेल्या व या प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच प्रशिक्षण घेता येईल.सर्व विषय समाविष्ट असलेल्या व शिक्षकांना उपयुक्त असे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यासाठी हजाराहुन अधिक व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!