ताज्या घडामोडी

इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालया तून १८ वर्षाखालील १९ बालकांना मुंबई (हाजी अली) येथील एसआरसीसी हॉस्पिटल मध्ये मोफत ह्रदय व इतर शस्त्रक्रिया करण्या साठी रवाना

Spread the love

इस्लामपूर दि.२१ प्रतिनिधी
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालया तून १८ वर्षाखालील १९ बालकांना मुंबई (हाजी अली) येथील एसआरसीसी हॉस्पिटल मध्ये मोफत ह्रदय व इतर शस्त्रक्रिया करण्या साठी रवाना करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यात हे तपासणी व रोग निदान शिबीर पार पडले होते. या बालकांच्या ह्रदय व इतर शस्त्र करण्यास साधारण ५० लाख रुपये खर्च येणार आहे.
यावेळी प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील,उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,सांगलीचे आयुब बारगीर,जयंत दारिद्र्य निर्मूलन समन्वयक इलियास पिरजा दे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अभियान चे संघटक विनायक मुळीक,श्रीकांत नाईक या बाल रुग्ण व पालकांच्या समवेत गेले आहेत. ना.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील हे या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देणार आहेत.
ना.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उप जिल्हा रुग्णालयात १८ वर्षाखालील बालकां ची तपासणी व रोग निदान शिबिर घेतले होते. हे शिबिर एसआरसीसी हॉस्पिटल,राजाराम बापू सहकारी साखर कारखाना,उपजिल्हा रुग्णालय व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने घेतले होते. या शिबिरात ९० बालकांची तपासणी व उपचार करण्यात आले होते. यातील ४५ बालकांच्या वर उपजिल्हा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार केले आहेत. यातील २१ बालकांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रिया मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये केल्या जात आहेत. या शत्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत केल्या जात आहेत. या उपक्रमातून बालक व त्यांच्या नातेवाईकांना मुंबईला पाठविण्यासाठी ६ वाहनांची व्यवस्था केली आहे. याकामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे,डॉ.संजय पाटील,उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,डॉ.सचिन शिंगटे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. जयंत दारिद्र निर्मूलन अभियान च्या संघटकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्व नियोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!