आरोग्य व शिक्षण

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळा नगरपरिषद व विविध पक्ष संघटना यांचेकडून ध्वजारोहन संपन्न …

Spread the love

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळा नगरपरिषद व विविध पक्ष संघटना यांचेकडून ध्वजारोहन संपन्न …

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१६ प्रतिनिधी.

भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंञ्यदिनानिमित्त लोणावळा नगरपरिषद व विविध पक्ष संघटना यांचेकडून ध्वजारोहन करण्यात आले.
लोणावळा नगरपरिषद इमारतीवर प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी , कर्मचारी , आजी माजी नगरसेवक , माजी नगरसेविका उपस्थित होते. यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीत शालेय गाईडच्या विद्यार्थीनी यांचा प्रशासन अधिकारी पंडीत पाटील , उपमुख्याधिकारी भगवान खाडे , माजी नगरसेवक राजूशेठ बच्चे , निखिल कविश्वर , सुधीर शिर्के , माजी नगरसेविका शादान चौधरी , मंदाताई सोनवणे , देविदास कडु ,ललीत सिसोदिया , माजी नगरसेवक , नगरसेविका यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर यांचे मॕक्डोल चे समोर असलेल्या सेल्फी पाँईंट चे समोर भव्यदिव्य अशा ध्वजस्तंभाची उभारणी केलेल्या स्थंभावर ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष रवि पोटफोडे , माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बोराटी , प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे , महिला शहराध्यक्षा उमाताई मेहता , माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष श्री.बडेकर यांनी भाषणात मोदी सरकाकार जोरदार हल्लाबोल केला..महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली असून त्यावर काही न बोलता , मोदींच्यावतीने अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिनानिमित्त हरघर तिरंगा योजना राबवण्याचे उपक्रम राबविले जाता असून स्वतः ला मिववून घेणे , हा यामागे उद्देश आहे.असे भाषणात सांगितले . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भरत उर्फ साहेबराव टकले , युवक अध्यक्ष विनोद होगले , प्रकाश गवळी , दिलीप पवार , नरेश खोंडगे , राजेश मेहता , शीलाताई बनकर , माधुरी हळवे , तसेच अजिंक्य कुटे , सोमनाथ गायकवाड , सलीम मणियार , अविनाश ढमढेरे , भरत हारपुडे , पोलिसपाटील प्रकाश हारपुडे , फकीर गवळी , मारूती राक्षे , युवक.पदाधिकारी सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे धनंजय काळोखे आदी उपस्थित होते. तिरंगा ध्वजारोहन करण्यात आले व त्याला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सलामी दिली. यावेळी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक , अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे अकस्मिकपणे अपघातात निधन झाल्याबद्दल त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
लोणावळा मंडल अधिकारी कार्यालयाचे वतीने लोणावळा तलाठी तुषार बढे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी नांगरगाव तलाठी नकुशा लोखंडे , भुशी तलाठी सुजाता रच्चेवार , वाकसई तलाठी सिध्दार्थ जाधव , कोतवाल सचिन घोणे , मधुकर गायकवाड ,पूनम वाघमारे , पोलिसपाटील प्रकाश हारपुडे आदी उपस्थित होते.

श्रीराम मंदिरासमोर गवळीवाडा येथे काँग्रेस आयचे वतीने शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी माजी नगरसेवक निखिल कविश्वर , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , सुवर्णाताई अकोलकर , पूजा गायकवाड , सिंधूताई कविश्वर , तसेच मनोज गवळी , बाबुभाई शेख, सुनिल मोगरे आदी सेवादलाचे पदाधिकारी , महिला आघाडी अध्यक्षा व पदाधिकारी , युवकचे , पदाधिकारी उपस्थित होते..
भाजपच्या वतीने पक्षाचे कार्यालयासमोर माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , माजी नगरसेवक ललीत सिसोदिया , बाळासाहेब जाधव, देविदास कडू , माजी नगरसेविका मँदा सोनवणे , बिंद्रा गणाञा , तसेच हर्षल होगले , पार्वती रावळ आदी उपस्थित होते.

लोणावळा शहर पोलिस स्टेशन समोर शहर पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी ए पी आय श्री.भावकर , फौजदार सौ.शिंदे , , एपीआय श्री.पवार , फौजदार श्री.मुजावर तसेच कर्मचारी उपस्थित होते.
लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशन व उपअधिक्षक कार्यालयासमोर लोणावळा ग्रामिणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश माने यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिसनिरिक्षक सचिन रावळ व अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!