ताज्या घडामोडी

जमिनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ऊसाचे पाचट जाळू नका- डॉ ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत उसाचे पाचट जाळू नये यासाठी तीन वर्षापासून धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत यासाठी कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे कृषी सहाय्यक वृषाली काकडे हे शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पंचायत समिती माजी सदस्य जगन्नाथ कोरडे यांनी त्यांच्या शेतावर ऊस तुटल्यानंतर पाचटाची कुट्टी करून शेतामध्ये गाडले आहे त्याची पाहणी प्रवरा संगम परिसरातील शेतकरी गणेश कासोदे केशव वाघमारे सुभाष दिघे ऋषिकेश शिंदे सुरेश काळे तसेच महिला शेतकरी कल्पना जाधव लता खरडे मंदा जाधव यांनी केली याप्रसंगी बोलताना डॉक्टर ढगे म्हणाले की सेंद्रिय पदार्थ हा शेतीचा आत्मा आहे सध्या उसाची तोड चालू आहेपाचटगाडल्यामुळे जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात सेंद्रिय कर्ब वाढते सामू उदासीन होतो व त्यामुळे जमिनीची आरोग्य चांगले सुधारते व पिकाची भरघोस उत्पादन येते सुडके यांनी उसाच्या पाचटाची कुट्टी करण्यासाठी तातडीने सबसिडीवर शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून देईल देण्यात येत आहे तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक वृषाली काकडे यांनी केले व सर्वांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!