आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर.

नगरपरिषदेचे यंदाचे शिलकी रकमेचे अंदाजपत्रक शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा देणारे असून त्यात कोणतीही करवाढ नाही.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रारंभिक शिल्लकेसह सादर करण्यात आले.The budget of Talegaon Dabhade Municipal Council for the financial year 2023-24 was presented with opening balance.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,८ मार्च.

हे अंदाजपत्रक २९७ कोटी ४८ लाख २४ हजार ८९५ रुपये जमेचे असून हे अंदाजपत्रक ४ लाख २४ हजार ८९५ रुपये शिल्लकेचे आहे. या अंदाजपत्रकामध्ये नागरिकांवर कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

या अंदाजपत्रकास प्रशासन अधिकारी संदेश शिर्के यांनी मंजूरी दिली असून यामध्ये विकास कामावर विशेष तरतूद केली आहे. हे अंदाजपत्रक प्रशासन अधिकारी संदेश शिर्के व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सादर केले आहे.याअंदाजपत्रकात स्वच्छता,आरोग्य,पाणी पुरवठा,रस्ते व नगरपरिषदेची नवीन कार्यालयीन इमारत बांधणी या विकासकामांवर विशेष वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेच्या सर्व खर्चासाठी २९७ कोटी ४४ लाख खर्च अपेक्षित धरला आहे.

या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टी,शासकीय अनुदान, अंशदान व शासकीय अर्थसहाय्य तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी व लायसन्स, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी,ठेवीवरील व्याज, आदी बाबींमधून नगरपालिकेस २९७ कोटी ४८ लाख २५हजार ८९५ रुपये उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

नगरपरिषद प्रशासनाने आलेल्या उत्पन्नातून आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च,कार्यालयीन खर्च,प्रवास,वाहतूक, इंधन,जाहिरात, मालमत्ता दुरुस्ती,वाहन दुरुस्ती, वीजबिल, पाणी पुरवठा कामाचे आणि व्यवहाराचे कंत्राट,कार्यक्रम खर्च, स्वच्छता अभियान खर्च ,नवीन रस्ते बांधणी व दुरुस्ती,पदपाथ, प्रसाधनगृहे, बांधकाम, शिक्षण,क्रीडा,उद्यान,आदी विकास कामावर २५४ कोटी १८ लाख ६० हजार ७१३ रुपये खर्च दर्शविलेला आहे.जमेच्या बाजूकडून येणारी रक्कम जास्त असून खर्चाची रक्कम कमी असल्याने हे शिलकेचे अंदाजपत्रक झाले असल्याचे लेखापरीक्षक तथा लेखापाल कैलास कसाब यांनी सांगितले.

        अंदाजपत्रकातील ठळक खर्चाच्या बाबी 

जिल्हा नगरोत्थान योजना : ४५ कोटी, राज्य नगरोत्थान योजना : ३०कोटी, अतिरिक्त विकास कामे : २९ कोटी १६ लाख. वैशिष्टपूर्ण योजना अनुदान : २८ कोटी, प्रशासकीय खर्च: २१ कोटी ५० लाख, उद्याने विकसित करणे : २० कोटी, भुयारी गटार योजना : २० कोटी, मालमत्त्यांच्या दुरुस्त्या : १७ कोटी ७८ लाख, नविन प्रशासकीय इमारत : १५ कोटी, शहरातील प्रकाश योजना :१५ कोटी, आस्थापना : १२ कोटी २० लाख.

        किरकोळ दुरुस्त्या अनुदाने व अंशदाने

८ कोटी १४ लाख, नाट्यगृह बांधणे : ३ कोटी ६० लाख, पंधरावा वित्त आयोग : ६ कोटी, पंतप्रधान आवास योजना : ३ कोटी, महिला व बालकल्याण निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५, दिव्यांग निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५, आर्थिक दुर्बल घटक निधी : ९३ लाख ५२ हजार ९७५

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!