ताज्या घडामोडी

छोट्या छोटया प्रयोगातूनच उद्याचे भावी शास्त्रज्ञ घडतील ‌ केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी

Spread the love

शिराळा, प्रतिनिधी
छोट्या छोट्या प्रयोगातूनच उद्याचे भावी शास्त्रज्ञ घडतील, व देश प्रगत होण्यास मदत होईल असे प्रतिपादन आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी केले. त्या जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक मोहन पवार म्हणाले की. 28 फेब्रुवारी 1928 रोजी डॉक्टर सी व्ही रमण यांनी रमन इफेक्ट हा शोध निबंध लिहून पूर्ण केला त्यामुळे त्यांना 1930 रोजी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले हा आपल्या देशातील बालकांसाठी एक प्रेरणादायी प्रसंग आहे. यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन काम केल्यास देश प्रगतीपथाकडे निश्चितच जाईल.
यावेळी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बाल प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निवळणे, गाळणे, कारंजे उडवणे, पदार्थाला उष्णता दिली असता ते गरम होतात, भिंगाद्वारे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण, विविध प्रयोगाच्या साहित्यांचा परिचय आदी उपक्रम घेण्यात आले. यावेळी शिक्षिका लताराणी पाटील ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेत्रा झाडे, अभिजित धर्माधिकारी, अजय कांबळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!