आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

“मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश.”

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष.संतोष खांडगे, यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Spread the love

“मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश.””Swami Vivekananda English School’s Great Success in Manthan General Knowledge Test.”

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० जुलै.

५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी घेण्यात आलेल्या मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे. च्या इयत्ता २री, इयत्ता ३री व ४थी एकूण ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यात इयत्ता ३री चा चि. स्वराज सुरेश चिमटे या विद्यार्थ्यांनी केंद्र स्थरावर २०० पैकी १९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता ३री ची कु. हितांशी किरण पाटील या विद्यार्थिनींने ३०० पैकी २२२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच चि. यशवर्धन विक्रम घारगे या विद्यार्थ्यांने ३०० पैकी २१२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच इयत्ता ४थी चा चि. साईराज गंगाधर कुऱ्हाडे या विद्यार्थ्याने ३०० पैकी १८६ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. चि. विनायक शिवराम पाटील व कु. ओजल महादेव त्रिमुखे या विद्यार्थ्यांनी ३०० पैकी१७३ गुण मिळवून दुसरा क्रमांक विभागून देण्यात आला. तर चि. सिद्धार्थ हेमंत कवडे या विद्यार्थ्यांने ३०० पैकी १७० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

या विद्यार्थ्यांना गायकवाड, शेख,  रेवांशेट्टी ,कांबळे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन केले होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मंथन सामान्य ज्ञान परीक्षा मंडळातर्फे प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष. संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा. रजनीगंधा खांडगे, सचिव. मिलिंदजी शेलार, मुख्याध्यापिका. शमशाद शेख, पर्यवेक्षिका. रेणू शर्मा यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!