ताज्या घडामोडी

इंगरूळ येथे किल्ला स्पर्धा संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / इगरूळ ता शिराळा समाजप्रबोधन ग्रुप, इंगरूळ या ग्रुपच्या माध्यमातून दिपावली निमित्त प्रथमच “भव्य किल्ले बनवा स्पर्धा” २०२२ आयोजीत केली होती ती नुकतीच पार पडली. या ग्रुप च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. या ग्रुप मध्ये सामाजिक कार्याची आवड असणारे समाजसेवक, माजी सैनिक, आधुनिक विचारांचे नागरिक, निःपक्ष पणे काम करीत असलेले आपणास पहावयास मिळत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून भविष्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येऊ शकतात. या ग्रुप मधील लोक रोज सकाळी शारिरीक व्यायामासाठी एकत्र येत असतात, आणि याच माध्यमातून आज रविवार दि.३०/१०/२०२२ रोजी स्मशानभूमी इंगरूळ ची स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत प्रा. बाजीराव तोडकर, आदर्श शिक्षक श्री राजू जाधव, डॉ. शंकर जद, इंजि. तानाजी जंगम, श्री भिमराव बोने, श्री वायसिंग पवार, माजी सैनिक श्री रघुनाथ गायकवाड, श्री अरविंद कडवेकर, श्री बाबासो कांबळे, डोळ्याने अंध असूनही समाज सेवेची तळमळ असणारे श्री वसंत यादव इत्यादींनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान दिले. या उपक्रमाचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. असेच अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम भविष्यात राबवण्यात येतील असे मत ग्रुपचे सदस्य श्री राजु जाधव, प्रा. तोडकर व डॉ.शंकर जद यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!