ताज्या घडामोडी

चेंबूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सुरू

Spread the love

मुंबई – चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील नागेश पाटील वाडीत असलेल्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाच्यावतीने सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळा सुरु असून तो गुरुवार १ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

या पारायण सोहळ्यामध्ये दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन,प्रवचन,
कीर्तन आणि जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू असून त्याला भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पारायण सोहळ्याचे नेतृत्व हभप धोंडीराम चिकणे महाराज,हभप दिलीप कदम महाराज,हभप शिवाजी साळुंखे महाराज,
हभप दिनकर मांजरे महाराज,हभप बांदल महाराज आणि हभप कृष्णा झेमसे हे करत आहेत.या पारायण सोहळ्याची सांगता हभप धोंडीराम चिकणे महाराज याच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवार १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यादिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या पारायण सोहळ्यामध्ये मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला इच्छुक रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.तरी परिसरातील सर्व भाविकांनी या पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!