ताज्या घडामोडी

मशाक कागदी यांचे दुःखद निधन

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १० (प्रतिनिधी) : येथील शास्त्री नगर भागात राहणारे सध्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत मशाक हबीब कागदी यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. १०) सायंकाळी ६ वाजता सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती कबरस्तान मध्ये बुधवारी (ता. ११) रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!