ताज्या घडामोडी

दत्त नागरी संस्थेस शिराळा नगरपंचायत मार्फत बर्ड फीडरचे वाटप

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सहकार क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणून नावारुपास आलेल्या काही अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक म्हणजे दत्त नागरी सहकारी पतसंस्था. या संस्थेमार्फत सध्या सहकार साप्ताहाचे आयोजन त्यांच्या विविध शाखांच्या ठिकाणी केले जात आहे. आज दिनांक १८/११/२०२२ रोजी संस्थेने आज शिराळा शाखेत सहकार साप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले. या सहकार सप्ताहाचे औचित्य साधत शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत या संस्थेच्या कौतुक सोहळ्यास उपस्थिती दर्शवत त्यांना एक निसर्गप्रेमी सदिच्छा संदेश देत देणारी आगळीवेगळी पर्यावरण पूरक भेट देण्यात आली. या प्रसंगी शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी या संस्थेचा गुणगौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्ताने पक्षांच्या अन्न व पाण्याची सोय करणारे बर्ड फीडर नगरपंचायत मार्फत यांना सदिच्छा भेट देऊन सन्मानित केले. आणि या बर्ड फीडरचे वैशिष्ट्य म्हणजे हे बर्ड फिडर पूर्णत: टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ या संकल्पनेतून बनवण्यात आलेला असून टाकाऊ तेलाचे डब्बे व टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून हा शाश्वत बर्ड फिडर बनवण्यात आलेला आहे. या वेळी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चे चेअरमन प्राचार्य डॉ श्रीकांत चव्हाण, व्हा.चेअरमन बी टी निकम, सहाय्यक निबंधक डी.एस.खताळ, प्रधान शाखेचे शाखा प्रमुख दिनेश हसबनीस, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!