ताज्या घडामोडी

मुंबई स्पोर्ट्स (मिळून सारे) तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात साजरा होणार

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई २८, ऑगस्ट (क्री. प्र.) मुंबई स्पोर्ट्स या संस्थेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात २९ ऑगस्ट २०२२ रोजी ३:३० वाजता साजरा होणार आहे. मुंबई स्पोर्ट्स या संस्थेत मुंबईतील जवळ जवळ सर्व क्रीडा क्षेत्रातील, क्रीडा संस्थांचे प्रतींनिधी या संस्थेबरोबर आहेत. हि संस्था गेली काही वर्षे सर्व क्रीडा प्रकारांना विविध सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमात मुंबई स्पोर्ट्स तर्फे जय कवळी व महेंद्र चेंबुरकर गेल्या वर्षभरातील केलेल्या कार्याचा आढावा मांडतील. तर आदिल सुमारीवाला व जया शेट्टी हे मुंबई स्पोर्ट्स ही संस्था म्हणून कसे काम करील या बद्दल विचार मांडतील.

या नंतर बगीचे / क्रीडांगण यांचे धोरण व त्याचा आपल्या खेळांना होणारा उपयोग याबद्दल उपसमितीतील सुदर्शन नायर, भास्कर सावंत, क्षितिज वेदक, बाळ तोरसकर, पाटणकर, धनंजय देशमुख आदि आपले विचार मांडतील.

संजय शेटे व नामदेव शिरगांवकर २०२२-२०२३ या वर्षातील पुढील वाटचालीबद्द्ल मार्गदर्शन करतील व त्यानंतर प्रदीप गंधे व उदय देशपांडे आपले विचार मांडतील. सर्वात शेवटी महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दहीहंडी या खेळाबद्दल चर्चासत्र आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे संचलन सौ. संजीवनी पूर्णपात्रे व सुनील वालावलकर करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!