आरोग्य व शिक्षण

तळेगावातील कडोलकर कॉलनीमध्ये बालदिन उत्साहात साजरा

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनी मधील  समाज मंदिरात बालदिन  उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कराटेचे प्रशिक्षण घेणा-या लहान मुलांना प्रशिक्षणासाठी  उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

कडोलकर कॉलनी समाज मंदिर येथे प्रशिक्षक रवींद्र वाघ ( ब्लॅक बेल्ट) संस्था OSK कराटे क्लब अँड मार्शल आर्ट अॅकडमी यांचे सोमवार -मंगळवार -बुधवार या तीन दिवसांमध्ये कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीवर्गा सोबत बालदिना चा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

इमारत बांधताना त्याचा पाया मजबूत केला तर ती पडत नाही व वर्षानुवर्षे चांगल्या प्रकारे टिकते त्याच प्रमाणे लहान मुलांना बालपणीच जर चांगले संस्कार व चांगले शारीरिक क्षमता तयार होण्यासाठी त्यांच्यामध्ये इच्छा शक्ती निर्माण केली तर येणारी भावी पिढी ही नक्कीच विचार व शरीराने मजबूत असेल हाच उद्देश समोर ठेवून तेथे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आज बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळेस लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे वडगावचे सर्पमित्र जिगर सोलंकी यांच्यामार्फत सापांची माहिती देणारा छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला. तसेच कराटे क्लास च्या मुलांनी प्रात्यक्षिक करून दाखवले यामध्ये महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवले

त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगरसेवक अमोल शेटे ,युवा उद्योजक बंटीदादा भेगडे, गटनेते अरुण भेगडे ,वराळे येथील उद्योजक रामदास भेगडे व कलापिनी चे संस्थापक डॉ अनंत परांजपे सर व पालक वर्ग उपस्थित होते.

उपस्थित सर्व लहान मुलांना प्रशिक्षणासाठी लागणारे उपयोगी सरप्राईज गिफ्ट व गुलाबाची फुले भेट देऊन व केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी तर कार्यक्रमाचे नियोजन जागरूक कट्टा समूह सभासद व ग्रामसुरक्षा दल सभासद सुरेश शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!